पुणे :  Ajit Pawar on Mumbai Bank vice president Election :मुंबई बँकेत भाजपला राष्ट्रवादी-शिवसेनेने जोरदार धक्का देत अध्यक्षपद आपल्याकडे खेचले. या बँकेवर भाजपचे वर्चस्व होते. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे  सिध्दार्थ कांबळे विजयी झाले. मात्र, उपाध्यक्ष निवडणुकीत एक मत फुटल्याने याचा फटका शिवसेनेला बसला. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. कोठे दगाफटका झाला, याची माहिती अजित पवार घेणार आहेत, असे संकेत त्यांनी दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई बँक उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मविआचे एक मत फुटले आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीला धक्का बसला आहे.  यामुळे उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे विठ्ठल भोसले विजयी झाले आहेत. तर शिवसेनेच्या अभिषेक घोसाळकर यांना पराभव स्विकारावा लागला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. मुंबई बँकेत शिवसेनेचा उपाध्यक्ष का होऊ शकला नाही याबाबत मला माहिती नाही. मुंबईत गेलो की काय घडलं ते बघणार, असे ते म्हणाले.


दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी बोलवलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकेर का उपस्थित राहू शकले नाहीत यावर टीका करण्याचे कारण नाही, असे सांगत विरोधकांना फटकारले. राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी राज्य सरकार घेत आहे. लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत मागणी नोंदवण्यात आली आहे, असे यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केले. 


आसाममध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भात महत्त्वाची माहिती



तर दुसरीकडे आसाममध्ये अडकलेल्या मुलांना (Assam students stuck) तातडीने परत आणण्याबाबत मदत व पुनर्वसन विभागला सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यांशी तसेच आसाममधील मुलांसंदर्भात साचिवांशी बोललोय. आसाममध्ये अडकलेल्या मुलांशी संपर्क झाला आहे. राज्य सरकार आसाम सरकारशी बोलून जी मुलं प्रवास करण्यास पात्र आहेत त्यांना सुखरुप परत आणणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.