मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला संयुक्त जाहीरनामा प्रकाशित केला आहे. यामध्ये शेती, आरोग्य, रोजगार, शिक्षणाला प्राधान्य देत अमुलाग्र बदल घडवून आणण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार असून सुशिक्षित बेरोजगा़रांना ५ हजार मासिक भत्ता देणार असे या जाहीरनाम्यात म्हटले आहे. केजी टू पीजी मोफत शिक्षण देण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासकीय आणि अनुदानित कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची तरतूद महाआघाडीचा शपथनाम्यात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


महत्त्वाचे मुद्दे 


- उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज
- प्रत्येकाला आरोग्य विमा
- कामगारांचे किमान वेतन २१ हजार रूपये करू
- स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना
- सर्व महापालिका हद्दीतील ५०० चौ.फूट पर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ 
- नव्या उद्योगांमध्ये ८० टक्के नोकऱ्या स्थानिक भुमिपुत्रांना
- मानव विकास निर्देशांक उंचावणार
- ग्लोबल वॉर्मिंगची दखल घेवून पर्यावरण रक्षणाचे काम करणार आहोत
- ठिबक, तुषार सिंचनासाठी १०० टक्के अनुदान 
- दुधाला उत्पादनावर आधारित भाव देणार
- औद्योगिक विजेचा दर अन्य राज्यांशी स्पर्धात्मक ठेवणार
- नीम अंतर्गत घेतलेल़्या कामगारांना पूर्णवेळ कामगाराचा दर्जा देणार
- नव्या मोटार वाहन कायद्यान्वये आकारण्यात येणारा नवा दंड कमी करणार
- जात पडताळणी व्यवस्था अधिक सुटसुटीत करणार
- महिला गृह उद्योगांच्या मार्फत होणारी उत्पादने जीएसटीतून वगळणार
- सच्चर कमिटीच्या शिफारशींची १०० टक्के अंमलबजावणी
- एमएमआरडीए प्रमाणे इतर शहरांतही स्वतंत्र विकास प्राधिकरणे स्थापणार