गेल्या वेळेपेक्षा मोठं सीमोल्लंघन होणार - पंकजा मुंडे
आज दसऱ्यानिेमित्त सावरगड येथे त्यांनी जनतेशी संवाद साधला.
बीड : 2014 मध्ये सुद्धा अमित भाई शाह इथे आले होते, त्यानंतर सीमोल्लंघन झालं, आता यावेळी त्यापेक्षा सुद्धा मोठं सीमोल्लंघन होणार असा विश्वास भाजपा आमदार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. आज दसऱ्यानिेमित्त सावरगड येथे त्यांनी जनतेशी संवाद साधला. अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पंकजा यांनी त्यांचे अभिनंदन केले. माझ्या भागातील लोकांना कोयता उचलायला लागू नये म्हणून आमचं प्रयत्न सुरु असल्याचे त्या म्हणाल्या. ही भूमी आमची चैत्य भूमी आहे. पाणी नसल्यामुळे आम्ही हे भगवान बाबांचे स्मारक पूर्ण करू शकलो नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी जनतेतून सीएम, सीएम तसेच अगला मुख्यमंत्री कैसा हो पंकजा जैसा हो अशा घोषणा येत होत्या.
आजचा कार्यक्रम म्हणजे आमचा प्रचार नाही. ही आमची गर्दी ही आमची राष्ट्रभक्ती आहे. ही आमच्या लोकांची साथ असल्याचा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. मुंडे साहेबांनंतर तुम्ही आहात ज्यांनी मला साथ दिली, माझ्या नेतृत्वाने विश्वास दाखवला, माझा श्वास हा तुमचा आहे, शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या साठी काम करत राहणार असेही त्या म्हणाल्या. मी सगळ्यांना हाथ जोडून विनंती करते, असेच सोबत राहा असे आवाहन त्यांनी समर्थकांना केले.
भगवान बाबांनी लोकांना प्रगतीचा मार्ग दाखवला, लोकांसाठी काम केलं, तेच काम पुढं गोपीनाथ राव, पंकजा यांनी केल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यावेळी म्हणाले. निवडणूक जाहीर झाल्यावर पहिला कार्यक्रम ओबीसी वंचित यांच्या साठी झाला हा भगवान बाबांचा आदेश आहे असाच समजून घेऊया असे आवाहन देखील शाह यांनी सावरगडावरून केले.