विदर्भ : एखाद्या प्रदेशाचा सर्वांगिण विकास याकरिता काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश बनविता येऊ शकत असेल तर विदर्भासह अन्य छोट्या राज्याच्या निर्मितीबाबतही सरकारनं पावलं का उचलत नाही ? असा प्रश्न ऍड श्रीहरी यांनी उपस्थित केला. विदर्भ राज्य निर्मितीच्या मुद्द्यावर विदर्भ राज्य आघाडी महागठबंधन करून निवडणुकीच्या मैदानात उतरली असल्याचे देखील श्रीहरी यांनी स्पष्ट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकांमध्ये स्थानिक आणि राज्याचे मुद्दे बाजूला ठेऊन इतरच मुद्द्यांकडे नागरिकांचे लक्ष भरकटविण्याचे काम सुरु असल्याची टीका अणे यांनी यावेळी केली. त्यामुळे निवडणुका शहरी मुद्द्यांकडून ग्रामीण मुद्यांवर केंद्रित व्हाव्या असेही मत अणे यांनी व्यक्त केले. विदर्भाचा मुद्दा जर जिवंत ठेवला नाही तर सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकही विदर्भ मुद्दा सोडून देतील आणि विदर्भाची सद्यस्थितीपेक्षाही बिकट हाल होतील अशी भीती श्रीहरी अणे यांनी व्यक्त केली.



सोबतच मतदारांनी आमच्या पक्षाचा नेता मोठा म्हणून मला निवडून द्या, असे म्हणणाऱ्या उमेदवारांपेक्षा स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन देखील केले.