ऐश्वर्या रायला दरवर्षी Cannes ला का बोलवतात? 22 वर्षातील खास 10 लूक

Aishwarya Rai Bachchan Cannne 2024 Look: 77 व्या ऍन्युअल कान्स फिल्म फेस्टिवल 2024 चा ऐश्वर्या रायचा लूक समोर आला.. यानंतर एकच चर्चा सुरु झाली. ऐश्वर्या पहिली भारतीय आहे जिला कान्सला तब्बल 22 वेळा बोलावण्यात आलं. 

| May 17, 2024, 13:28 PM IST

लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटमधील लूकची जोरदार चर्चा सुरु आहे. 2024 कान्समधील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. असं असताना ऐश्वर्याचा हात फ्रॅक्चर झाला असला तरही तीचा रेड कार्पेटवरील लूक अतिशय आत्मविश्वासाने भरलेला आहे. ऐश्वर्या राय ही अशी अभिनेत्री आहे जिला आतापर्यंत 22 वेळा म्हणजे दरवर्षीच कान्स फिल्म फेस्टिवलला बोलावलं आहे. यामागचे कारण काय? हे समजून घेणार आहोत. सोबतच ऐश्वर्याचे कान्समधील 10 खास लूक देखील पाहणार आहोत. 

1/10

कान्सचा आताचा लूक

ishwairya Rai Bachchan Top 10 Glamorous Look

कान्स 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चन फ्रान्समध्ये पोहोचली आहे. रेड कार्पेटवर ऐश्वर्या पहिल्यांदा काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसली होती. हाताला दुखापत असूनही तो सुंदर चालला. गाऊन कॅरी करण्यासाठी तिची मुलगी आराध्याशिवाय 4 लोकांची टीम होती. तिच्या ग्लॅम स्क्वॉडच्या गटाने लांब पोशाखांची ट्रेन पकडून तिला रेड कार्पेटवर आणताना दिसले.

2/10

ऐश मोनोक्रोमॅटिक लूकमध्ये दिसली

ishwairya Rai Bachchan Top 10 Glamorous Look

ऐश्वर्याच्या आउटफिटबद्दल बोलायचे झाले तर तिने काळ्या आणि सोनेरी रंगाचा गाऊन परिधान केला होता. या ऑफ शोल्डर ड्रेसवर तिच्या ड्रेसवर सोनेरी अलंकार होते. ऐश्वर्याने तिचा मेकअप कमीत कमी ठेवला आणि मोठ्या सोनेरी रंगाच्या हूप्सने तिचा लूक पूर्ण केला. ऐश्वर्याच्या या लुकला मोनोक्रोमॅटिक लूक म्हणतात. तिने पांढऱ्या श्रगसह काळ्या रंगाचा एक रंगाचा ड्रेस पेअर केला. फाल्गुनी आणि शेन या डिझायनर जोडीने त्याची रचना केली आहे.

3/10

फॅशन जगतात कान्सचं महत्त्व

ishwairya Rai Bachchan Top 10 Glamorous Look

कान्सचे रेड कार्पेट फॅशन जगतात खूप महत्त्वाचे मानले जाते. चित्रपटांच्या प्रमोशनसोबत येथे फिरणारे सेलेब्स नवीन डिझायनर्सचे पोशाखही दाखवतात. यासोबतच फ्रान्सलाही आपली संस्कृती सादर करण्याची संधी मिळते.

4/10

ऐश्वर्या दरवर्षी का होते सहभागी

ishwairya Rai Bachchan Top 10 Glamorous Look

ऐश्वर्या राय आतापर्यंत 22 वेळा कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये उपस्थित राहिली आहे. 2002 साली पहिल्यांदा कान्समध्ये ऐश्वर्या रायने हजेरी लावली. 

5/10

या कारणामुळे ऐश्वर्याला बोलावतात

ishwairya Rai Bachchan Top 10 Glamorous Look

ऐश्वर्या रायला भारतातील संस्कृती दाखवण्यासाठी आमंत्रित केलं जातं. तसेच ऐश्वर्याकडे भारतातील सौंदर्य किंवा भारतातील सर्वात सुंदर महिला म्हणून बोलावलं जातं. 

6/10

ऐश्वर्याचे वेगळेपण

ishwairya Rai Bachchan Top 10 Glamorous Look

ऐश्वर्याने आतापर्यंत आपलं वेगळेपण कान्समध्येही जपलं आहे. 2002 पासून कान्स फेस्टिवल सुरु झालं. 2003 पासून ऐश्वर्या राय बच्चनला आमंत्रित करण्यात आलंय. कधी आईसोबत, पती अभिनेता ऐश्वर्या राय बच्चनसोबत तर यंदा लेक आराध्यासोबत ऐश्वर्या कान्सला उपस्थित राहिली. 

7/10

पहिल्यांदा पिवळ्या साडीत झळकली ऐश्वर्या

ishwairya Rai Bachchan Top 10 Glamorous Look

ऐश्वर्या राय 2003 मध्ये पहिल्यांदा कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये झळकली. यावेळी तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. ऐश्वर्याने यावेळी भारतीय संस्कृतीचं दर्शन कान्समध्ये दाखवली. 

8/10

हिरव्या साडीचा लूक देखील चर्चेत

ishwairya Rai Bachchan Top 10 Glamorous Look

ऐश्वर्या राय बच्चन कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये साडीमध्ये देखील झळकली आहे. हिरव्या रंगाची साडी कॅरी केलेल्या ऐश्वर्याने भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं आहे. 

9/10

ऐश्वर्याचं हास्य

ishwairya Rai Bachchan Top 10 Glamorous Look

ऐश्वर्या राय आपल्या हास्याने चाहत्यांंच मन जिंकत आहे. कान्स फेस्टिवलमध्ये ऐश्वर्याने स्वतःच वेगळेपण जपलं आहे. 

10/10

ishwairya Rai Bachchan Top 10 Glamorous Look

ऐश्वर्या कायमच तिच्या सौंदर्याने सगळ्यांच मन जिंकते. निखळ त्वचा आणि तिचा लूक हा कान्समध्येही सगळ्यांचं लक्ष वेधत आहे.