ठाणे : आगामी विधानसभेत अंबरनाथची जागा भाजपला मिळाली नाही, तर आम्ही शिवसेनेचा प्रचार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपच्या अंबरनाथ शहर कोअर कमिटीने घेतली आहे. यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव वाढला आहे. 


सेना जागेवर भाजपचा दावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबरनाथची जागा १९९० पासून शिवसेनेच्या ताब्यात असून शहरात आमदार, खासदार, नगराध्यक्ष सगळेच शिवसेनेचे आहेत. मात्र आता भाजप हळूहळू आक्रमक होत असून आम्हाला जागा मिळाली नाही, तर आम्ही शिवसेनेचं काम करणार नसल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. मात्र यावर शिवसेनेनं उपरोधिक टीका केली आहे. 


शिवसेनेची टीका


भाजपची ही कोअर कमिटी नसून पोर कमिटी असल्याचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर म्हणाले. तसेच जे स्वतः निवडून येऊ शकत नाहीत, त्यांनी आमदार निवडून आणण्याच्या गोष्टी करू नयेत, असे म्हणत त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना चिमटा काढला.