लातूर : लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. लातूरमधील सारडा रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपासून ते रूग्णालयात दाखल आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


धीरज देशमुख यांना व्हायरल इन्फेक्शनमुळे दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून धीरजचा प्रचार बंद आहे. मतदान जवळ आले असतानाच धीरज देशमुख आजारी पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.