औरंगाबाद : किमान 50 जागा दिल्या तरच आम्ही वंचित सोबत जाण्याचा विचार करू शकतो असे एमआयएमचे नेते इम्तियाज जलिल यांनी स्पष्ट केले आहे. बाळासाहेबांना पुन्हा काँग्रेसकडे जायचं असेल तर वंचित आघाडी कशाला ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आरएसएसने आंबेडकरांच्या कानात काहीतरी सांगितल्याचेही ते यावेळी म्हणाले. एमआयएमकडून इच्छुक उमेदवारांसाठी उद्यापासून मुलाखती सुरू होणार आहेत. 


महत्त्वाचे मुद्दे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमआयएम आणि वंचितची आघाडी झाली होती तेव्हा लोकांकडून भरभरून  प्रतिसाद मिळाला, आमची अपेक्षा होती की ही अघाडी विधानसभेतही असायला हवी. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता संपली आहे. बाळासाहेब आंबेडकर यांचा आदर आहे.आम्ही त्यांना देशाचा नेता म्हणून पाहत होतो.  ही आम्हाला सुवर्ण संधी होती. 


जुलैमध्ये अधिवेशन सुरू असताना दिल्लीला ओवेसी आणि आंबेडकर बैठक झाली होती. त्यावेळी यादी लवकर पाठवा असे बाळासाहेब म्हणाले. आम्ही त्यानुसार राज्याची यादी बनवली आणि त्यांना पाठवली. त्यात 98 जागांची मागणी होती. त्यानंतर आम्ही आमची मागणी 74 जागांची केली. ही अंतिम यादी आम्ही 10 जुलै ला आंबेडकरांना पाठवली. त्यांचं उत्तर ही आलं पण नंतर प्रतिसाद आला नाही. त्यांच्या संसदीय कमिटी कडूनही प्रतिसाद आला नाही,


त्यांनी पुन्हा 2 दिवस मागितले, उत्तर आलं नाही त्यानंतर काही दिवसांनी ई-मेल आला, 74 जागा देऊ शकत नाही कमी करून सांगा
असा वंचित कडून निरोप आला. नंतर पुन्हा पुण्यात बैठक ठरली. आंबेडकर यांनी माझ्यासोबत न बोलण्याची भूमिका का घेतली ? हे माहीत नाही. मी पुण्याचा बैठकीत बाहेर थांबलो. त्यावेळी 2 दिवसात निर्णय देतो असे बाळासाहेब म्हणाले पण निर्णय काही आला नाही. 


नंतर थेट ई-मेल केला आणि 8 जागा देऊ शकतो असे कळवले. वंचितला असं वाटत असेल की एमआयएमला वोट बँक नाही, मुस्लिम त्यांचं ऐकत नाही तर आम्ही काय करणार ? शेवटी मी प्रदेशाध्यक्ष आहे. मी ओवेसी यांना पुन्हा बोललो. प्रयत्न केला मात्र ते 8 जागांवर ठाम होते. अखेर आमचाही वेगळा पक्ष आहे आमचं ही अस्तित्व आहे. म्हणून आम्ही पत्र तयार केलं आणि वंचित पासून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 


आता वंचित म्हणत असेल की इम्तियाज सोबत बोलणार नाही तर काय बोलू ? इम्तियाज आणि ओवेसी यांचं पटत नाही असले घाणेरडे आरोप ते करतात. मला तुमच्या पेक्षा जास्त बोलता येतं हे त्यांनी लक्षात ठेवाव. तुम्ही म्हणताय बोलणी सुरू आहे. सगळे अधिकार मला आहेत. कुणासोबत बोलताय ते तरी सांगा. मला कुणीही फोन केला नाही, माझी कुणासोबतही चर्चा सुरू नसल्याचे ओवेसी मला म्हणाले. याचा अर्थ आंबेडकर खोटं बोलले असं न बोलता इम्तियाज बोलून गेले.



आम्ही कदापि 8 जागा स्वीकारणार नाही. आम्ही उद्यापासून आमच्या मुलाखती सुरू करून आमचे उमेदवार उद्यपासून जाहीर कारू. रस्ता असेल तर अजूनही काही तयार आहोत. इम्तियाज जलीलला यात खलनायक करण्यात येतंय ते वाईट आहे, आंबेडकरांसोबत जाणं ही माझीच कल्पना होती.मी ओवेसी साहेबांना गळ घातली होती. तुम्ही मला खलनायक करताय हे चूक आहे.


बाळासाहेबांनी आता ही मोठं मन दाखवावे आणि ओवेसी साहेबांसोबत बोलावे. उगाच दिवस वाया घालवू नये. हे चांगल्या रीतीने झालं असतं वंचित ने त्यांच्या प्रवक्त्याना आवरायला हवे.