परळी : धनंजय मुंडे संपला पाहिजे यासाठीच हे चाललंय असा आरोप राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. मला खलनायक करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी २००९ ला या मतदारसंघाचा त्याग केला. त्यांच्याकडून मला संपवण्याचा प्रयत्न केला जातोय असेही ते म्हणाले. धनंजय मुंडे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी जे भाषणात बोललो त्या व्हिडीओचा एडीटींग केला आहे. नवीन भावानं आमच्या बहिण भावाच्या नात्यात विष कालवायचं काम केलंय. मी सगळी नाती जपली पण हे वेदनादायी आहे. मी पंकजा आणि प्रीतम कडून राखी बांधून घेतलीय. दोन भावांमध्ये विष कालावलं त्याच फळ मी आजही भोगतोय. आमचं रक्ताचं नातं आहे. माझ्या शब्दाचा अनर्थ कोण काढला यामागे खोलवर जाईन असेही ते म्हणाले. माझी खरी व्हिडीओ क्लीप आणि व्हायरल होणारी क्लीप फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवा. त्यात काय निष्पन्न झाल तर मी स्वत: जीव देईन. मी नाती जपणारा माणूस आहे असेही ते म्हणाले.



पंकजा मुंडे यांना भोवळ आल्याप्रकरणीही त्यांनी भाष्य केले. निवडणुकीचा ताण, सलग ४१ मिनिटे भाषण केल्यानंतर ही भोवळ आल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 


कोणाच्या मनाला लागेल असं कधी बोललं नाही. माझा भाषणाचा आशय पुन्हा एकदा पाहा... मी असं काही बोललं नाही. लोकांना मारहाण झाली, कार्यकर्त्यांना मारहाण झाली त्यांनी माझ्याकडे तक्रार केली. त्यासाठी रेटलं हा शब्द वापरला असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 


विरोधकांनी लोकांच्या मनांत स्थान निर्माण करून निवडणूक जिंकावी. भावनेच्या हवेत निवडणूक जिंकू द्यावी का ? मला असं वाटलं की जग सोडावं असे म्हणत धनंजय मुंडे भावनिक झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय 


पोलिसांनी माझ्या भाषणाची सीडी तपासली नाही. तरी माझ्यावर गुन्हा दाखल केला. काहींना वाटतंय की मी पृथ्वीतलावर नसलो पाहीजे. मी विरोधी पक्षनेता असताना राजधर्म पाळला. पण आता जे केलं जातंय ते कशासाठी ? असा प्रश्न त्यांनी व्यवस्थित केला. मुंडे साहेबांसोबत एका बैठकीत सुरेश धस उपस्थित असताना, माझ्या बहिणीबद्दल अपशब्द वापरणा-याचं मी तोंड दाबण्याचा प्रयत्न केल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले.