मुंबई : आम्हाला युतीमध्ये 220 जागा मिळतील असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. आतापासून आचारसंहिता सुरु झाली. पोटनिवडणूक लागण किंवा न लागण हा निवडणूक आयोगाचा विषय आहे. तेच यावर समर्पक उत्तर देतील असे चंद्रकांत पाटील म्हणाले. जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसताना चंद्रकांत पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारची पोटनिवडणूक लागली नाही मग उदयनराजेंची काय भुमिका असेल ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी जरी पोटनिवडणूक लागली नसली तरी उदयनराजे हे भाजपाचे आहेत. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ते पुर्णपणे प्रयत्न करतील असे त्यांनी स्पष्ट केले.



२१ ऑक्टोबरला मतदान 


महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम, निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आला आहे. २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. २७ सप्टेंबरला निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणार आहे. तर ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्जाची मुदत असणार आहे. ५ ऑक्टोबरला अर्जाची छाननी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे या पत्रकार परिषदेची उत्सुकता संपली असून आजपासून निवडणूक आचारसंहिता लागली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.