शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत मिळणार, थेट खात्यात पैसे जमा - वडेट्टीवार
शेतकऱ्यांना (Farmers help) दिवाळीआधी (Diwali) मदत मिळणार आहे. तशी व्यवस्था महाविकास आघाडी सरकारने केली आहे.
नागपूर : शेतकऱ्यांना (Farmers help) दिवाळीआधी (Diwali) मदत मिळणार आहे. तशी व्यवस्था महाविकास आघाडी सरकारने केली आहे. राज्य सरकार ४ हजार ७०० कोटी रुपये लगेच जिल्ह्याधिकाऱ्यांकडे पाठवणार आहेत. आणि लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, (Assistance to farmers will be credited directly to the account before Diwali) असे सांगत विरोधकांनी सत्तेत असताना ५० हजार कोटी रुपये दिले म्हणून सांगितले, पण ते दिसले नाही, असे थेट आरोप मदत आणि पूर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला.
आम्ही दिलेली रक्कम पुरेशी नाही असे जर विरोधक म्हणत असतील तर त्यांनी केंद्राकडून मदत निधी आणावा, असे आव्हान विजय वडेट्टीवार यांनी भाजपला दिले आहे. विरोधी पक्षनेत्यांनी मागणी करणे हे कामच आहे. मात्र मागे वळून पाहिलं तर खूप उशिरा मदत मिळाली. आम्ही केंद्राची वाट न पाहता तातडीनं मदत केली आहे. ४१ लाख शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करणे सोपे नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, विदर्भातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आम्ही करतोय. याचे कोणी क्रेडिट देण्याची गरज नाही. केंद्र सरकारने एनडीआरएफची टीम अजून राज्यात पाठवलेली नाही. केंद्र सरकारने अजून एक रुपयांची मदत केली नाही. राज्याने केंद्राकडे एकूण १ हजार कोटींची मागणी केली अजून मदत मिळाली नाही. मग विरोधकांना बोलण्याचा अधिकार आहे का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आम्ही राज्य सरकार म्हणून मदत करतो आहोत. केंद्र करत नाही, मात्र विरोधक याबाबत काहीही बोलत नाही. हा शेतकऱ्यांची थट्टा करणारा प्रकार आहे. मंदिराच्या नावावर विरोधक राजकारण करत आहे. माणूस महत्त्वाचे आहे की मंदिराचे हे ठरवावे लागेल.आता कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे, अनेक मंदिर सुरू करून बंद केले. त्यामुळे विचार करुनच पावले उचलण्यात येत आहे. विरोधकांनी राजकारण करण्याचे थांबवावे, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले आहे.