कोल्हापुरात लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार होणार
कोल्हापूर महानगरपालिकेने या निर्णयाची अंमलबजावणीही सुरु केली आहे.
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर: राज्यातील कोरोना रुग्णांच्या Coronavirus वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता कोरोनाची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार केले जाणार आहेत. त्यादृष्टीने खासगी रुग्णालयांना निर्देश देण्यात आले असून लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर त्यांच्या देखरेखीखाली उपचार होतील.
जिम, शॉपिंग मॉल, स्विमिंग पूल लवकरच सुरु होणार
कोल्हापूर महानगरपालिकेने या निर्णयाची अंमलबजावणीही सुरु केली आहे. सध्याच्या घडीला दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार सुरु आहेत. अर्थात यासाठी संबंधित रुग्णाच्या घरी स्वतंत्रपणे राहण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. आता आगामी काळात हा निर्णय कितपत यशस्वी ठरतो, हेदेखील पाहावे लागेल. तसेच राज्याच्या इतर भागातही अशाप्रकारची व्यवस्था राबविली जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
धारावीत कोरोनाचे केवळ ५ तर दादरमध्ये ५८ रुग्ण
दरम्यान, बुधवारी राज्यात कोरोनाचे सर्वाधिक १०,५७६ रुग्ण आढळून आले. तर २८० जणांचा मृत्यू झाला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.६२% एवढे आहे. सध्या मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरी ठाणे आणि पुण्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या चिंताजनक मानली जात आहे.
कोरोनाच्या उपचारांसाठी विविध शाखांतील तज्ज्ञांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा
कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. त्यानंतर तज्ज्ञांना मार्गदर्शक सूचना तयार करुन टास्क फोर्सकडे द्याव्यात जेणेकरुन एकात्मिक औषधोपचार देऊन रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जातील.