कल्याण : एटीएसने कल्याण शहर परिसरात मोठी कारवाई केली आहे. नक्षलवाद्यांना सहकार्य केल्याप्रकरणी आणि नक्षली कारवायांना मदत केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यत आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्षलवाद्यांचे लोण हे शहरांपर्यंतही पोहोचले असल्याच्या बातम्या येत असतानाच एटीएसच्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. प्राप्त माहिती अशी की, सुरूवातीला एटीएसने एकाला अटक केली. त्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या अधारे एटीएसने इतर सहा जणांना अटक केली.



अटक केलेल्या व्यक्तींची अद्याप नावे समजू शकली नाहीत. मात्र, त्या सातही जणांना सध्या पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.