Anil Deshmukh :आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर हल्ला
Anil Deshmukh Attack : आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
Anil Deshmukh Attack : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञाताने दगडफेक केली. या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता. आज संध्याकाळी काटोल विधानसभा मतदारसंघामधील नरखेडमधील सांगता सभा संपल्यानंतर अनिल देशमुख परत असताना हा हल्ला झाला. अनिल देशमुखांची गाडी तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या हल्ल्यानंतर अनिल देशमुख यांना काटोल रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलंय.
अनिल देशमुख यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतरचा व्हिडीओ समोर आला आहे. यात त्यांच्या गाडीसमोरील काचावर एक मोठा दगड फेकल्याचा दिसत आहे. अनिल देशमुख यांच्या डोक्याला जोरदार मार लागला आहे. डोक्यातून रक्त येताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गाडीवर फेकण्यात आलेल्या दगडामुळे समोरील काचे फुटली आणि त्या काचेचे तुकडे हे समोर बसलेल्या अनिल देशमुखांच्या डोक्याला मागले. घटनेनंतर अनिल देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेले आहेत. तिथल्या स्थानिक डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपुरात हलवण्यात आलंय.
दरम्यान हा हल्ला नेमका कुणी केला? आणि त्यापाठीमागचं कारण काय? याबाबत अद्याप माहिती कुठलीही माहिती हाती आलेली नाही. मात्र सुप्रिया सुळे झी 24 तासवर बोलत असताना या हल्ल्याचा निषेध केला असून या घटनेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केलीय.
अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात आहेत. याचे उदाहरण आज निवडणुकीच्या सांगता सभेवरून घरी परतताना राज्याचे माजी गृहमंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून समोर आले.