पुणे : Attack on Kirit Somaiya in Pune : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे शिवसेना कार्यकर्ते ( Shiv Sena activists) पोलिसांसमोर हजर झाले आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार का याकडे लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, पुण्यात शिवसैनिकांच्या अटकेच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आहेत. शहरप्रमुख संजय मोरे कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता. 


शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे आणि इतर कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्याची कारवाई सुरु झाली आहे. त्यांनतर त्यांना न्यायलायात नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना जामीन मिळणार की कोठडी याकडे लक्ष लागले आहे.


दरम्यान, न्यायव्यवस्था आणि महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान ठेऊन आम्ही सर्व शिवसैनिक उद्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे सकाळी 10 वा उपस्थित राहणार आहोत, अशी माहिती पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिली होती. त्यानुसार संजय मोरे आणि कार्यकर्ते आज पोलीस ठाण्यात उपस्थित राहिले.


दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या झटापटीत खाली पडून त्यांना दुखापत झाली होती. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला.  माझी हत्या करण्याचा प्लँन होता, असा आरोप त्यांनी यावेळी केला.