चंद्रशेखर भुयार / उल्हासनगर :  Attempt to commit suicide on railway tracks : सुपरफास्ट जाण्याऱ्या एक्स्प्रेस समोर तरुणाने उडी मारली. त्याचवेळी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांने आपला जीव धोक्यात घालून या तरुणाचा जीव वाचवला. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातील (Vithalwadi railway station) घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका तरुणाने भरधाव एक्सप्रेस समोर उडी मारल्याची घटना आज दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडली. यावेळी तिथे उपस्थित रेल्वे पोलिसाने जीव धोक्यात घालून या तरुणाला रेल्वे रुळातून बाजूला केलं. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.


 कुमार गुरुनाथ पुजारी असे रेल्वे रुळात उडी मारणाऱ्या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो उल्हासनगरच्या प्रेमनगर टेकडी भागात राहतो. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कुमार पुजारी हा विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येऊन उभा राहिला. यावेळी कल्याणहून कर्जतच्या दिशेने जाणारी एक्स्प्रेस भरधाव वेगात येताना पाहून कुमार याने अचानक रेल्वे रुळात उडी मारली आणि एक्सप्रेस समोर उभा राहिला.



ही बाब तिथल्या रेल्वे पोलिसांना दिसताच येताच रेल्वे पोलिसांनी तातडीने प्रसंगावधान दाखवत रेल्वे रुळावर उडी घेतली आणि या तरुणाला रेल्वे रुळावरून बाजूला केले. ऋषिकेश चंद्रकांत माने असे या तरुणाला वाचवणाऱ्या रेल्वे पोलीस जवानाचे नाव आहे. त्याच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, कुमार पुजारी याने कौटुंबिक वादविवादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत.