सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune) गुंडांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुण्यात वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवसेना पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर काल रात्री हल्ला करण्यात आला, तर  भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन युवकांनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली. काही लोकांना या गुंडांनी जखमीही केलं. या घटना ताज्या असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात एका महिला रिक्षा चालकावर (Woman Auto Driver) बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याचं समोर आलं आहे. (Pune Crime News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला रिक्षाचालकावर बलात्काराचाप्रयत्न
प्रवासी (Passenger) म्हणून रिक्षात बसलेल्या एका व्यक्तीने रिक्षा चालक असलेल्या महिलेसोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील कात्रज घाटात ही घटना घडली. रिक्षा चालक महिलेने आरोपीला विरोध केला असता त्याने संपूर्ण कपडे काढून, नग्न अवस्थेत या महिलेचा कात्रज घाटात पाठलाग केला. कात्रज घाटात 26 डिसेंबरच्या रात्री दहा वाजता हा सगळा प्रकार घडला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti University Police Station) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.


याप्रकरणी 38 वर्षीय महिला रिक्षा चालकाने तक्रार दिली आहे. निखिल अशोक मेमजादे (वय 30) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. महिला रिक्षा चालकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. 26 रोजी आरोपी रात्री आरोपी कात्रज घाटात जायचं आहे असं सांगत महिला चालक असलेल्या रिक्षात बसला. कात्रज घाटातील एका लॉजिंग जवळ रिक्षा थांबून त्याने महिला चालक यांना जेवणासाठी जबरदस्ती केली. मात्र या महिलेने नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण करत तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. 


हे ही वाचा : 'यहां के भाई लोग हम है...' म्हणत गोळीबार, पुण्यात शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला


यावरच आरोपी थांबला नाही तर त्याने त्याचे सर्व कपडे काढून नग्न अवस्थेत रिक्षात बसला. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी महिला कात्रज घाटात पळून जात असताना आरोपीने देखील नग्न अवस्थेत तिचा पाठलाग केला. या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करत आहेत.