COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद: औरंगाबादचे भाजप आमदार अतुल सावे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फेसबुकच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. 


नरेंद्र मोदींबाबत अपशब्द 


एका आमदाराचा लवकरच खून करणार असे सांगत पंतप्रधान मोदीबाबत सुद्धा या पोस्टमध्ये अपशब्द लिहण्यात आले आहेत. धमकी देणारा हा माणूस युवक काँग्रेसचा माजी जिल्हाध्यक्ष असल्याचं सांगण्यात येतंय, या धमकी बाबत जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे.