औरंगाबाद : देशातील दहशतवादी कारवायांचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. एकिकडे भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण असतानाच दुसरीकडे औरंगाबाद येथे दहशतवाद विरोधी पथक, म्हणजेच एटीएसकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. खुलताबाद परिसरातून एटीएसने एका डॉक्टरला ताब्यात घेतलं. दहशतवाद्यांशी संपर्कात असल्याच्या संशयावरुन त्याला अटक करण्यात आली होती. ज्यानंतर  संबंधित प्रकरणाची कसून चौकशीही करण्यात आली, पण चौकशीतून डॉक्टरकडून कोणतीच माहिती मिळू न शकल्यामुळे त्याची सुटका करण्यात आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एटीएसच्या ताब्यातून या डॉक्टरची सुटका करण्यात आलेली असली तरीही त्याच्यावर पथकाची करडी नजर असणार आहे. शिवाय एटीएसच्या परवानगीशिवाय त्याला शहर किंवा गाव सोडून जाता येणार नाही आहे. काही दिवसांपूर्वी मुंब्रा आणि औरंगाबाद या ठिकाणहून एकूण नऊ तरुणांना एटीएसने ताब्यात घेतलं होतं. हे तरुणही आयसीसच्या संपर्कात असून, ते विषबाधेच्या प्रयोगाने एका मोठ्या नरसंहाराचा कट रचत होते. त्यांच्याशीच ही डॉक्टरही संपर्कात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अन्नातून विषबाधेचा प्रयोग कसा करावा याची माहिती त्यांना याच डॉक्टरकडून मिळत असल्याचं उघड झालं होतं.. बरेच दिवस नजर ठेवल्यानंतर अखेर या डॉक्टला ताब्यत घेण्यात आलं आहे. त्याची ओळख अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आली असून, या प्रकरणी पुढील चौकशीला वेग आला आहे. 


मंदिराच्या प्रसादातून विषबाधा करत नरसंहार घडवण्याचा होता कट 


अटक करण्यात आलेले हे तरुण इंटरनेटच्या माध्यमातून एक विषारी औषध तयार करत असून त्या रसायनाच्या माध्यमातून मोठा नरसंहार घडवून आणण्याच्या तयारीत ते होते. विषारी रसायनाच्या मदतीने ते पुणे, औरंगाबाद  आणि मुंबईतील मंदिरांबाहेर देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या माध्यमातून घातपात घडवून आणण्याच्या बेतात होते.