औरंगाबादच्या छावणीत १८०० लोकांना ग्रॅस्ट्रोची लागण
छावणी परिसरातील १८०० लोकांना ग्रॅस्ट्रोची लागण झाली आहे. आतापर्यंत अडीच हजार लोकांना ग्रॅस्ट्रोची लागण झाली आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील छावणी परिसरातील १८०० लोकांना ग्रॅस्ट्रोची लागण झाली आहे. आतापर्यंत अडीच हजार लोकांना ग्रॅस्ट्रोची लागण झाली आहे.
आता १८०० लोकांना ग्रॅस्टो
शनिवारी रात्रीपासून लोकांना हा त्रास होवू लागला आहे, सुरूवातील हे प्रमाण कमी वाटत असलं तरी आता १८०० लोकांना ग्रॅस्टो आहे, आतापर्यंत २५०० नागरिक ग्रॅस्ट्रोच्या फेऱ्यात आले आहेत.
छावणी नगरपरिषदेच्या सीईओंनी चौकशीचे आदेश
रूग्णांची संख्या एवढी वाढली आहे की, रूग्णांना जमिनीवर झोपवून उपचार सुरू करण्यात आले आहेत, या प्रकरणी छावणी नगरपरिषदेच्या सीईओंनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं सीईओँनी म्हटलं आहे.
लष्करातील डॉक्टरही मदतीसाठी सरसावले
छावणी हा परिसर लष्कराच्या ताब्यात येत असल्याने लष्करातील डॉक्टरांनीही आता मदतीस सुरूवात केली आहे, लष्करातील डॉक्टरही आता सर्वसामान्य लोकांच्या उपचारासाठी पुढे आले आहेत.
दोषीं अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
अशुद्ध पाण्यामुळे ग्रॅस्ट्रोचं प्रमाण वाढलं असल्याचं सांगण्यात येत असलं, तरी यामागील मुख्य कारण शोधण्याचं आणि यामागे दोषीं अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.