औरंगाबाद : राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवत आहेत. मात्र हा प्रकार या पक्षांसाठी नवा नाही. याआधी औरंगाबाद जिल्हा परिषदेत या तिन्ही पक्षांनी एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे. त्यावेळी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेत ही महाशिव आघाडी घडवून आणली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपला 23, शिवसेना 18 , काँग्रेस 16 , एनसीपी 3 आणि इतर 2 जागा असे निकाल लागले होते. त्यात शिवसेना भाजप एकत्र येऊ शकले असते मात्र अध्यक्ष कुणाचा यावरून शिवसेना भाजप मध्ये वाद सुरू झाले आणि अध्यक्ष पदासाठी शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीला जवळ केलं आणि भाजपला सत्तेबाहेर ठेवलं.


2017 मध्ये औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये राबवलेल्या हाच फॉर्म्युला आता शिवसेना राज्यात राबवताना दिसत आहे. 



हालचालींना वेग 


सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा झालीय. तसंच काँग्रेसच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांशीही उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचं पत्र मिळवण्यासाठी शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत. शिवसेना आज संध्याकाळी राज्यपालांना भेटून बहुमत सिद्ध करण्यासाठीचं संख्याबळ सादर करणार आहे.