विशाल करोळे, झी मीडिया, मुंबई : कचरा प्रश्नी आजही तोडगा निघाला नाही. त्यामुळे सलग १३ व्या दिवशी सुद्धा औरंगाबादमध्ये काचरकोंडी कायम आहे. महापालिकेनं आजही कचरा प्रश्नावर सक्षम तोडगा न दिल्याने खंडपीठाची नाराजी व्यक्त केलीये.


काय म्हणाले कोर्ट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज औरंगाबाद शहरातील कच-याप्रकरणी सुनावणी झाली. ‘ज्या ठिकाणी कचरा महापालिकेला टाकायचा आहे, त्या ठिकाणच्या लोकांना विश्वासात घ्यावे. पोलीस बळाचा वापर यासाठी प्रशासनाने करू नये, असे खंडपीठाने सांगितले. तसेच राज्याच्या मुख्य सचिवांनी प्रकल्पबाबत सगळ्या प्रक्रिया १५ दिवसात पूर्ण करणार असे लेखी शपथपत्र द्यावे, असेही खंडपीठाने सांगितले. 


पुढील सुनावणी कधी?


गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात कच-याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली असून आता याबाबत कोर्टात सुनावणी सुरू आहे. औरंगाबाद महापालिकेच्या भोंगळ कारभारावर याआधी कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. आता पुढील सुनावणी ५ मार्चला होणार आहे.