औरंगाबाद : औरंगाबादचा कचरा प्रश्न सोडवण्याआठी आता नागरिकांनी एक पाऊल पुढं टाकलं आहे, आज औरंगाबादच्या काही नागरिकांनी एकत्र येत हा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेला मदत करण्याचा ठरवलं आहे.


चूक जरी महापालिकेची असली, तरी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चूक जरी महापालिकेची असली, तरी आता प्रश्न गंभीर झाला आहे, आणि हा सोडवणे सगळ्यांचे कर्तव्य असल्याचं मत या बैठकीत मांडण्यात आले, 25 नागरिकांची एक टीम बनवण्यात येणार आहे, आणि या माध्यमातून ओला कचरा सुखा कचरा वर्गीकरणाचं प्रशिक्षण नागरिकांना देण्यात येणार आहे.


नागरिकांची जबाबदारी शहर स्वच्छ ठेवण्याची


नागरिकांची ही जबाबदारी शहर स्वच्छ ठेवण्याची आहे त्यामुळं त्यांनीही आता शहर घाण होणार नाही, याची काळजी घेण्याची आवाहन ही नागरिकांचे हे फोरम करणार आहे.