COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद : इच्छा असली कि मार्ग सापडतोच या म्हणीला औरंगाबादच्या आजीने सार्थ करून दाखवलंय. धृपादाबाई एडके असं या आजीच नाव असून या आजीने आपल्या नातीसोबत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आता या आजीला पास करायची आहे ती बारावीची परीक्षा. धुपदाबाई औरंगाबादच्या बालाजी नगर भागात आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. संसाराचा गाडा हाकताना अनेक इच्छा अपूर्ण राहिल्या. शिक्षण ही त्याच इच्छांपैकी एक. मात्र कुटुंब स्थिरावल्यावर आजीने जिद्दीने दहावीची परीक्षा पास केली.  शिक्षण घेण्याची त्यांची इच्छाशक्ती त्यांना प्रौढ शिक्षणाकडे घेऊन गेली.


एका झटक्यात पास  


आधी चौथी, नंतर सातवी आणि दहावी आजीने एका झटक्यात पास केली. त्यांच्या सोबत त्यांची नात म्हणजे मुलीची मुलगी मिताली होती. दोघींनी एकमेकीना साथ देत दहावीचा महत्वाचा टप्पा पार केला. स्वयंपाक, शेतीची काम सांभाळून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून मेहनतीने परीक्षा उत्तीर्ण केली.