औरंगाबाद : पती- पत्नीच्या नात्यामध्ये आलेलं वादळ अनेकदा इतकं विकोपाला जातं की, या नात्यामध्ये टोकाची पावलं उचलली जातात. आरोप-प्रत्यारोप आणि रोषाच्या भावनेनं पेटून उठलेल्या अशाच एका नात्यानं सध्या औरंगाबादकरांचं लक्ष वेधलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादमध्ये एका महिलेनं तिच्या पतीच्या प्रेयसीला भर चौकात बेदम मारल्याची घटना घडली आहे. पतीच्या वागण्या बोलण्यावर संशय असल्याने पत्नीनं पतीवर पाळत ठेवली. पतीवर पाळत ठेवत तिनं त्याचा पाठलाग केला. 


औरंगाबादेतील वरद गणेश मंदिर चौकालगतच्या एका हॉटेलमध्ये तिनं दोघांना रंगेहाथ पकडलं आणि भर चौकात धू धू धुतलं. पत्नी आल्याचे पाहून काहीक्षण पतीला धक्काच बसला. पतीच्या मैत्रिणीला मारहाण करतानाचा औरंगाबादेतील हा व्हिडिओ साध्य सोशल मीडियावर चंगलाच व्हायरल होत आहे.



मालिका नव्हे, हा तर खऱ्या आयुष्याचा 'प्लॉट'
औरंगाबादमध्ये घडलेली ही घटना पाहता, संपूर्ण घटना पाहता हा कोणत्या एका मालिकेचा प्लॉट आहे असं तर तुम्हाला वाटत असेल, तर तसं नाहीये. खऱ्याखुऱ्या आयुष्यात ही घटना घडली असून, विवाहबाह्य प्रेमसंबंध ठेवणं पतीरायाला महागात पडलं आहे हेच यातून दिसतं. पतीच्या वागण्याबोलण्यात आलेली चपळाई पाहून महिलेनं हे टोकाचं पाऊल उचललं आणि हा सारा प्रकार उघड झाला.