विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे औरंगाबादमध्ये लॅाकडाऊन करण्यात आला होता. परंतु आता हा  लॅाकडाऊन  मागे घेण्यात आला आहे. या मध्ये दररोज दुकाने  संध्याकाळी 8 वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत. परंतु रात्रीची संचारबंदी ही कायम ठेवली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारकडून दुकान उघडण्यासाठी ही संमती देण्यात आली आहे. औरंगाबादेत वाढती रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र हा निर्णय तुर्तास मागे घेण्यात आला आहे. 


कदाचित येणाऱ्या काही दिवसात परिस्थिती अधिक बिकट आणि नियंत्रणाबाहेर जात आहे, असं दिसलं तर औरंगाबादमध्ये कधीही लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. 29 मार्च रोजी १२७२ नवीन रूग्ण औरंगाबादेत आढळले होते, तर २६ लोकांचा एका दिवसात मृत्यू झाल्याने प्रशासन हादरले होते.