औरंगाबाद : औरंगाबादच्या राजकीय वर्तुळातील चर्चेत असणारं आणि दबदबा असणारं नाव म्हणजेच हर्षवर्धन जाधव यांना अटक होण्याची शक्यता आहे. ऍट्रॉसिटी प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका टपरी चालकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला जाधव हे त्यांच्या निवासस्थानी नसल्याचं कळत असून, त्यांचा शोधही घेतला जात आहे. 



काय होतं प्रकरण? 


भाग्यनगर येथे हर्षवर्धन जाधव यांचा एक भूखंड आहे. याच भूखंडाशेजारी एका गृहस्थांनी टपरी सुरु केली होती. पण, टपरी सुरु करण्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचं म्हटलं गेलं. याचप्रकरणी रितसर तक्रारही दाखल करण्यात आली. क्रांती चौक पोलीस स्थानकात याविषयीचा गुन्हा नोंदवला गेला.