औरंगाबाद : औरंगाबादेत एक प्राध्यापिकेला कोरोना पोसिटीव्ह आल्यानंतर त्या प्राध्यापिकेच्या ६५० वर विद्यार्थांना वेगळं ठेवण्यात आलं होतं. गेली १४ दिवस हे सगळे विद्यार्थी हॉस्टेल मध्येच वेगळे होते. मात्र गुरुवारी रात्री त्यांचा १४ दिवसांचा विलागीकरण काळ संपला आणि त्यांना मोकळं करण्यात आलंय, एकही विद्यार्थ्यांमध्ये लक्षण न दिसल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदेशातून आल्यावर कोरोनाग्रस्त प्राध्यापीकेने वर्ग घेतले होते. त्यानंतर ही महिला पॉझिटिव्ह झाली होती दरम्यान ती प्राध्यापिका ही आता बरी आहे आणि तिला हॉस्पिटल मधून सुट्टी झालीये.



कोल्हापूरमध्ये २ रुग्ण 


कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोना व्हायरसला फारसं गांभीर्यानं न घेण्याऱ्या कोल्हापूरकरांनी अधिक सावधानता बाळगायला हवी. एका पुरुष आणि एका महिला रुग्णाच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग अधिक सतर्क झालाय. 


यातील महिला रुग्ण सध्या सांगली जिल्ह्यात उपचार घेत आहे तर दुसरा रुग्णावर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार घेत आहे. तांत्रिक दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात एकच रुग्ण असल्याचं आरोग्य विभागच म्हणणं असल तरी सांगलीत उपचार घेणारी महिला कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव इथली आहे.