औरंगाबाद : औरंगाबादमध्ये धक्कादायक आणि तितकीच संतापजनक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमधल्या पैठण तालुक्यातील एका गावात दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने एका वस्तीवर हल्ला चढवला. यावेळी दरोडेखोरांनी दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास 7 ते 8 दरोडेखोरांननी शेत वस्तीवर हल्ला चढवला. वस्तीवर असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवत त्यांना बांधून ठेवलं. तसंच कुऱ्हाडीच्या दांड्याने त्यांना जबर मारहाणही केली. त्यानंतर एका 23 वर्षीय आणि एका 30 वर्षीय महिलेवर चार दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केला. यानंतर घरातली रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन दरोडेखोर पसार झाले. 


या घटनेने पैठण हादरलं असून घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून पीडित महिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.