विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : हेअर कट करायचा असेल किंवा स्पा घ्यायचा असेल तर आपण थेट सलून गाठतो. मात्र हीच सोय आता प्राण्यांसाठी देखील उपलब्ध आहे. औरंगाबादेत खास पाळीव प्राण्यांसाठी अशा पद्धतीचं खास सलून उभारण्यात आलं आहे. श्वानाला खास आंघोळ घालण्यासाठी, त्याचे केस आणि नखं कापण्यासाठी त्याला या प्राण्यांच्या सलून कम स्पामध्ये घेऊन जाण्यात येतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादमध्ये खास पेट सलून सुरू झालं आहे. इथे तुमच्या आवडत्या टॉमीची अथवा मनीची सगळी सरबराई केली जाते. हेअर कटपासून ते शॅम्पू बाथपर्यंत सगळं काही केलं जातं. पाळीव प्राण्यांची एकाच छताखाली अशी छान आलिशान बडदास्त ठेवली जात असल्यानं प्राणीप्रेमीही सुखावले आहेत.



अनेकजण घरी प्राणी पाळायचे पण त्यांची चांगली निगा कशी ठेवायची, असा प्रश्न त्यांना पडायचा, त्यातूनच या पेट सलून कम स्पाची कल्पना सुचल्याचं सलून मालक सांगतात. किमान 200 ते जास्तीत जास्त दीड हजार रुपये खर्चात इथं पाळीव प्राण्यांसाठी विविध सेवा उपलब्ध आहेत. सध्या कुत्रा आणि मांजरींच्या झिरो कटची जोरदार चर्चा आहे. नजीकच्या भविष्यात या प्राण्यांच्या वेगवेगळ्या हेअर स्टाईल दिसल्या तर आश्चर्य वाटून घ्यायला नको.