औरंगबाद: शहरातील कचऱ्याची समस्या कधी सोडवणार, याचा जाब विचारत ज्येष्ठ महिलांनी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमातच खासदार चंद्रकांत खैरे यांना घेरले. मात्र माजी महापौर विकास जैन यांनी झोपडपट्टीतल्यासारख्या का वागता असे विचारत उलट त्यांनाच उद्धट वागणूक दिल्याचे समजते. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालाय.


सोशल मीडियावर संताप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नाही तर खासदार चंद्रकांत खैरे हेही उलट त्या महिलांना सुनावत असल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय. हा सगळा प्रकार खासदार, महापौर यांच्यासमोर झाल्यानं सध्या सोशल मिडियावर संताप व्यक्त केला जातोय.


सभागृह नेत्यांचे वक्तव्य ऐकून संतापल्या महिला


औरंगाबाद शहरात जागोजागी कचरा साचला आहे. तुम्ही काहीच कामे करत नाही. आम्ही तुम्हाला मतदान केले. कामे करणार नसाल तर यापुढे मतदान करणार नाही, असे महिलांच्या शिष्टमंडळाने खासदार चंद्रकांत खैरेंना महाराष्ट्र दिनाच्या ध्वजवंदनानंतर सुनावले. त्यावर आपण ज्येष्ठ आहात. समाजसेवक आहात, झोपडपट्टीच्या भाषेत बोलू नका, असे सभागृह नेते विकास जैन म्हणताच महिला संतापल्या. मात्र, खासदार खैरे आणि महापौर नंदकुमार घोडेले याना मात्र याचे दुःख वाटले नाही. ही घटना मंगळवारी महाराष्ट्रदिनी पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर घडली.