नागपूर : बांगलादेश व भारतदरम्यान झालेल्या महत्वपूर्ण करारा अंतर्गत आज १८५ ट्रक पहिल्यांदाच जलमार्गाने बांगलादेशला रवाना करण्यात आले.  केंद्रीय जहाजमंत्री मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे हिरवी झेंडी दाखवून या प्रकल्पाचा शुभारंभ केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ६ टक्के असलेली जलवाहतूक पुढील दोन वर्षात १८ ते २० टक्क्यांवर नेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. रस्ते व रेल्वे वाहतुकी पेक्षा जलवाहतुकीचा खर्च हा सर्वात कमी असल्याने सरकार जलवाहतूक वाढवण्याच्या प्रयत्न करीत असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.


देशाला साडेसात हजार किलोमीटरचा समुद्री मार्ग आहे तर १११ नद्यांना जलमार्गात रुपांतरीत करणार असल्याचे गडकरी म्हणाले... जलमार्गाचा वापर करून चेन्नईचे वाहन निर्माते उत्तर भारतात व गुडगावची मारुती कंपनी त्यांचे वाहन चेन्नईला पाठवू शकते व याकरिता मी स्वतः चेन्नई च्या वाहन निर्मात्या कंपन्यांशी नोलणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. जलमार्गाचा वापर केल्यास नवा उद्योग वाढीस येईल याचबरोबर निर्यात वाढून रोजगार निर्मिती होणार असल्याचेही गडकरी यावेळी बोलले.