Sunrays On Ramlalla : अयोध्यानगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. भव्य दिव्य मंदिराची रचना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. मंदिराचा पहिला टप्पा बांधून पूर्ण झाला आहे. गाभाऱ्यावरील शिखराचे काम पूर्ण झाल्यानं रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) करण्यात आली. राम मंदिराची नागर शैलीत रचना करण्यात आली आहे. ही शैली निवडण्यामागे उत्तर भारत आणि नद्यांना लागून असलेल्य भागात नागर शैली प्रचलित आहे. अशातच राम मंदिर आणि कोल्हापूरचं (Ambabai temple of Kolhapur) एक कनेक्शन समोर आलंय. ते नेमकं काय आहे? पाहुया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिरात किरणोत्सवाचा सोहळा


अयोध्या राम मंदिरात एक विशेष 'सूर्य टिळक' तंत्र आहे, ज्याची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, दरवर्षी श्री राम नवमीच्या दिवशी दुपारी सूर्याची किरणे मूर्तीच्या कपाळावर पडतील. ही किरणे सुमारे 6 मिनिटे प्रभू रामाची मूर्तीवर पडतील, अशी माहिती  केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली. गिअरबॉक्स आणि रिफ्लेक्टिव्ह लेन्स अशा प्रकारे मांडण्यात आले आहेत की स्पायरजवळील तिसऱ्या मजल्यावरून येणारी सूर्यकिरण थेट गर्भगृहात पडतील, असंही जितेंद्र सिंह यांनी सांगितलंय.


कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर


कोल्हापूरच्या प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात नोव्हेंबर महिन्यातील 9 ते 13 तारखेदरम्यान आणि 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत किरणोत्सवाचा सोहळा होतो. यावेळी सूर्याची मावळती किरणं अंबाबाई मंदिराच्या पायापासून तिसऱ्या दिवशी चेहऱ्याला स्पर्श करतात. चौथ्या आणि पाचव्या दिवशी किरणं पुन्हा पायाला स्पर्श करून जातात. भाविकांसाठी हा मनमोहक सोहळा असतो. अशातच आता प्रभू श्रीरामावर देखील हा किरणोत्सव होणार आहे.


सीएसआयआर-सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे रुरकी यांनी मुख्य मंदिराची रचना, 'सूर्य टिळक' यंत्रणा डिझाइन करणं, मंदिराचा पाया आणि मुख्य मंदिराच्या संरचनात्मक आरोग्याची रचना-तपासणी केली. भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांनी देखील योगदान दिलं आहे. हैदराबादच्या सीएसआयआर-नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने मंदिराच्या पायाची रचना आणि भूकंपीय सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण समर्थन प्रदान केलं. तीन मजली मंदिराची रचना भूकंप-प्रतिरोधक आणि रिश्टर स्केलवर 8 तीव्रतेपर्यंतचे भूकंप सहन करण्यास सक्षम बनवण्यात आली आहे, अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.