पुणे : संगमनेरच्या बी. जे. खताळ शाळेच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी पहाटे 4 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. तळेगावाजवळ सहलीच्या बसने ट्रॉलीला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात शाळेचे 15 विद्यार्थी आणि 3 शिक्षक जखमी झाले आहेत. सहलीची बस परतत असताना बसला अपघात झाला आहे. महत्वाचं म्हणजे बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला सहलीच्या बसची धडक बसली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तळेगाव-दाभाडे परिसरात हा अपघात झाला आहे. रस्त्याच्या मधोमध बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला बसनं धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. संगनेरमधील बी.जे.खताळ शाळेचे विद्यार्थी सहल संपवून परतत असताना पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. सहलीच्या बसनेच्या उसाच्या ट्रॉलीला धडक दिली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही मात्र 15 विद्यार्थी आणि 3 शिक्षक जखमी झाले आहे. या अपघातात चालकाची प्रकृती गंभीर जखमी आहे. 



सर्व जखमींना जवळच्या खासगी रूग्णालयात उपचाराकरता दाखल केलं आहे. सहलीच्या बसने उसाच्या ट्रॉलीला धडक दिल्याने ट्रॉलीतील सर्व उस रस्त्यावर पसरला आहे. त्यामुळे महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. अपघाताने वाहतुकीची खोळंबा झाला आहे.