Baba Siddique Murder Case :  12 ऑक्टोबर 2024 ठिकाण - वांद्रे पूर्व वेळ - रात्री 9.30 वाजता बाबा सिद्दीकी झिशान सिद्दीकीच्या ऑफिसमधून बाहेर पडले.. ऑफिससमोरून देवीची मिरवणूक जात होती.. फटाके वाजत होते... आणि तेवढ्यात हल्लेखोरांनी डाव साधला... तोंडावर रुमाल बांधून आलेल्या हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्या.. एक गोळी छातीत लागली.. तर एक कार्यकर्ताही जखमी झाला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबा सिद्दीकींना लीलावतीमध्ये नेलं.. मात्र फार उशीर झाला होता.. बाबा सिद्दीकींचा मृत्यू झाला होता..बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुंबईसह राज्यात एकच खळबळ उडालीय... बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने स्विकारल्याची पोस्ट व्हायरल होतेय. त्याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय.. 


4 जणांनी सुपारी घेऊन बाबा सिद्दीकींची हत्या केल्याची माहिती सूत्रानी दिलीय. प्रत्येक आरोपी 50 हजार रुपये वाटून घेणार होते... पंजाबच्या जेलमध्ये असताना हे तिघेही आरोपी एकमेकांच्या संपर्कात आले होते. आधीच जेलमध्ये असलेला एक आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित होता. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट गेल्या काही महिन्यांपासून रचल्याचीही माहिती सूत्रानं दिलीय.. 


असा शिजला हत्येचा कट


आरोपी दीड महिन्यांपासून मुंबईत राहत होते.  2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात भाड्याच्या खोलीत राहत होते. आरोपी राहत असलेल्या खोलीला 14 हजार भाडं होते.  वांद्रे परिसराची आरोपींकडून रेकी करण्यात आली होती. बाबा सिद्दीकींच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात होते.  4 जणांना हत्येची सुपारी घेतली होती.  प्रत्येक जण 50 हजार रुपये वाटून घेणार होते.  पंजाबमध्ये तुरुंगात असताना आरोपींची एकमेकांशी ओळख झाली होती. यापैकी एक आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित आहे. गुरमैल सिंह - हरियाणा,  युपीचा अल्पवयीन आरोपी  शिवा तसेच मोहम्मद झिशान अख्तर अशी  बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या  चार आरोपींची नावे आहेत.  बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी चौरही जणांची ओळख पटलीय.. तर चौर पैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली.  या प्रकरणातील चौथ्या आरोपीचा  पोलिसांनी शोध सुरू केलाय.. चौथ्या आरोपीच्या अटकेनंतरच या हत्येमागचा खरा सुत्रधार कोण याचा छडा पोलिसांना लागणार आहे.