Video Viral : गरम तव्यावर बसून भक्तांना शिवीगाळ करणाऱ्या बाबा गायब; भक्तांनी केला अजब दावा
Video Viral : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी येथील हा भोंदू बाबा आहे. हा बाबा तप्त तव्यावर बसून भक्तांना शिवीगाळ करतो. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. श्री संत सच्चिदानंद गुरुदास महाराज असं या बाबाचं नाव आहे. झी 24 तासनं या बाबाचा समाचार घेतल्यानंतर बाबानं दरबाराला दांडी मारली.
Viral Video on Baba sit on the stove : बातमी आहे झी 24 तासच्या इम्पॅक्टची. अमरावतीच्या मार्डी येथील भोंदू बाबाने झी 24 तासाच्या बातमीचा चांगलाच धसका घेतला आहे. गरम तव्यावर बसून भक्तांना शिवीगाळ करणाऱ्या या बाबाने आपला दरबार रद्द केला. बाबा गायब झाल्यानंतर त्याच्या भक्तांनी अजब दावा केला आहे. या बाबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी येथील हा भोंदू बाबा आहे. हा बाबा तप्त तव्यावर बसून भक्तांना शिवीगाळ करतो. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. श्री संत सच्चिदानंद गुरुदास महाराज असं या बाबाचं नाव आहे. झी 24 तासनं या बाबाचा समाचार घेतल्यानंतर बाबानं आजच्या दरबाराला दांडी मारली. बाबाचे भक्त मात्र बाबा तीर्थयात्रेला गेल्याचा दावा करत आहेत.
काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी येथील एका भोंदूबाबा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. यामध्ये हा बाबा चक्क गरम तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद देत असल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओमध्ये संत सच्चिदानंद गुरुदास महाराज म्हणून स्वत:ला महाराज समजणारा भोंदूबाबा तव्यावर बसून भक्तांना आशीर्वादच देत नाही तर, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुद्धा करताना दिसत आहे.
दैवी शक्ती प्राप्त होत असल्याचा दावा
दैवी शक्ती प्राप्त होत असल्याचा दावा या बाबाने केलाय. दैवी शक्ती दरम्यान मला भान राहत नसून मी अंधश्रद्धा पसरवत नसल्याचे या भोंदूबाबाचा दावा आहे. त्यामुळे अंनिसने या बाबाला चॅलेंज दिले आहे. महाराजांचा हा चमत्कार खरा असेल तर त्यांनी तो आमच्यासमोर सिद्ध करावा. आम्ही तीस लाखांचं बक्षीस देऊ नाहीतर महाराजाला अटक करावी अशी मागणी अंनिसने केली.
या भोंदूबाबाच्या अमरावतीत मठ आहे...या मठात आमची टीम पोहोचली त्यावेळी मठाला टाळ लागल्याचे पाहायला मिळाले. भोंदूबाबाच्या मठात काम करणारे त्याचे भक्त उपस्थित होते. त्या भोंदूबाबाने अर्वाच्य भाषेत दिलेल्या शिव्या म्हणजे महाराजांचा आशिष आहे असा दावा भक्तांनी केला.
भोंदूबाबा भक्तांना शिव्यांचा आशीर्वाद देतोय
भोंदूबाबा भक्तांना शिव्यांचा आशीर्वाद देतोय. आम्ही या भोंदूबाबाचं समर्थन करत नाही. हे भोंदूबाबा पैसे कमावण्यासाठी अंधश्रद्धा पसरवत असतात आणि भक्त त्यांना बळी पडतात. मात्र, अशा बाबांपासून तुम्ही सावध राहा, असं आवाहन अंनिसने केले.