Bacchu Kadu : प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू  ( Bacchu Kadu News) यांना दोन वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. ( MLA Bacchu Kadu sentenced to two years) सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यानंतर बच्चू कडू यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाने जामीन दिला आहे. सामान्य माणसाने पत्र दिल्यानंतर सात दिवसात उत्तर दिले पाहिजे. एकही उत्तर दिले गेले नाही. कायद्याची ऐशी की तैशी तत्कालीन संबंधित आयुक्तांनी केली. हक्काचा निधी खर्च करत नाही. अधिकार म्हणून केले आणि शिक्षा आम्हाला सुनावली गेली, असे बच्चू कडू म्हणाले. (Maharashtra Political News)


 '353 चा अतिरेक होतोय, अधिकारी याचं करतायेत कवच'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्र देऊनही उत्तर दिले जात नाही. तीव वर्षे निधी खर्च केला नाही. आमचा हेतू तत्कालीन आयुक्ताला मारण्याचा उद्देश नव्हता. तीन 3 टक्के खर्च का करत नाही म्हणून आम्ही आलो होतो. आता 353 चा अतिरेक होत असून अधिकारी याचं कवच ते करत आहेत. विधान सभा अधिवेशनात याबाबत आवाज उठवला जाईल. विधानसभेत जमले तर 353 वरुन लक्षवेधी मांडणार आहे. देशातले गुन्हेगार जर पाहिले तर याचा विचार झाला पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.


सरकारी अधिकाऱ्यावर हात उगारणं भोवलं, आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा


 विधान सभेतून कायदा आणि मंत्रालय चालत आहे. मुख्यमंत्री कार्यालय सचिवाल्यातून चालते. 353 मध्य नवीन कमिटमेंट करण्याची गरज काय? मुख्यमंत्री , सर्व आमदार यांना भेटणार आणि या विषयावरुन विधान सभेत जाणार आहे. नेहमी नेहमी धमकी देण्याची गरज काय? आमच्यावर 32 गुन्हे आहेत. त्यामुळे सतत न्यायालयात हजर राहणे कसे शक्य आहे, असा सवाल बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला.


दरम्यान,  सरकारी वकील सचिन बोरवडकर यांनी सांगितले की, 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर बचू कडू यांना तात्पुरता जामीन मिळाला आहे. 24 मे 2017 साली मनपा आयुक्तालयात बचू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत अर्वाच्य भाषेत बोलल्याने व शासकीय कर्मचाऱ्यांना अपमानित केल्याने न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली होती.


काय आहे हे प्रकरण?


अपक्ष आमदार बच्चू कडू यांना सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करणे चांगलेच भोवले आहे. नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आयुक्त अभिषेक कृष्णा (Nashik Municipal Commissioner) यांच्यावर आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होता. हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. या प्रकरणात बच्चू कडू यांना नाशिक जिल्ह्या कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावलीआहे. 


नाशिक आयुक्तांवर हात उगारल्या प्रकरणी बच्चू कडू यांना दोन वेगवेगळ्या प्रकारणात ही दोन वर्षाची शिक्षा झाली आहे. याप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालायात सुनावणी सुरु होती. 2017 साली नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु होते.  तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारणे, धमाकवने आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदर बच्चू कडू यांच्यावर होता. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 1, तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी 1 अशी 2 वर्षांची शिक्षा आहे.