अनिरुद्ध दवाळे, अमरावती​ : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी काही दिवसांपूर्वी मंदिर उघडण्या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. त्या पत्रात त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर राज्यपाल यांच्यावर महाविकास आघाडीने जोरदार टीका केली होती. त्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आज नाराजी व्यक्त केली असतानाच आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील राज्यपाल यांच्या भूमिकेचा विरोध केला आहे. राज्यपालांसारख्या एका महत्वाच्या व्यक्तीने अशी भुमीका मांडण दुर्दैवी असल्याचं मतही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या प्रमाणे राज्यपाल बोलत आहे ते चुकीचं आहे. अस कुनी एकदा गावाचा सरपंच जरी बोलला असता तर मोठा गोंधळ झाला असता. एका राज्यपाला सारख्या महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने अस बोलावं हे राज्यासाठी दुर्दैवी बाब आहे त्याचा आम्ही निषेध करतो अस बच्चू कडू म्हणाले.


राज्यातील महाविकास आघाडी सुरळीत सुरू असताना भाजप कडून त्यात बिघाडी आणण्याच काम सुरू आहे. सरकार ला राष्ट्रपती राजवट कडे नेन्याचा भाजप प्रयत्न आहे असा आरोप त्यांनी केला. पण त्यात ते यशस्वी होणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. आता राज्यात मंदिर, मजिद बौद्ध विहार उघडण्याची गरज नाही तर शाळा उघडण्याची गरज आहे आपले रुग्णालय मजबूत करण्याची गरज आहे असेही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.