मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी अमेरिकेतुन आमदार आणावे लागतील असा टोला प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी लगावला आहे. विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेनं शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. विधानसभा निवडणुक निकालानंतर रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल आणि भंडाराचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यावर आता प्रहार जनशक्तीच्याही दोन आमदारांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला. शिवसेना जो निर्णय घेईल त्यासोबत आम्ही असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार हे आता राष्ट्रवादीच्या विधिमंडळाचे नेते राहीले नाहीत. त्यामुळे अजित पवार आणि व्हीप हा मुद्दाच होऊ शकत नसल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. 



अजित पवारांकडून विधिमंडळ गटनेते पदाचे पत्र घेऊन भाजपने बहुमत दाखवत शपथविधीही केला. आता बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत गेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात परतले आहेत. १६२ आमदार असल्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे. त्यामुळे कागदावर तरी महाविकास आघाडीचे पारडे जड वाटत असले तरी तात्रिंक बाबी पाहता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.