अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : राज्याचे नेतृत्व महिलेने करावे. महिला नेत्यावर राज्याचा मुख्यमंत्री(woman Chief Minister)पदाची जबाबदारी सोपवण्यासंबंधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी एक विधान केले होते. यामुळे महिला मुख्यमंत्री पदाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला.  महिला मुख्यमंत्र्यांच्या वादात शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू(Bachu Kadu ) यांनी देखील उडी घेतली आहे. बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघाले आहे. सध्या महिला मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू असतांना बच्चू कडूंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला. यावर कडू यांना विचारले असता त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.


उद्धव ठाकरे यांना काहीच जमलं नाही म्हणून त्यांनी नवीन उपक्रम सुरू केला. तेव्हाच महिला मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं, ते तुमच्यापेक्षा बरं राहिलं असतं असा खोचक टोला माजी मंत्री बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लागावल्याने चर्चांना उधाण आले आहे. ते अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते.


उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राज्यात पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण असतील याची चर्चा सुरु झाली. रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांची नावे चर्चते आहेत. महिला मुख्यमंत्री झाल्यावर महिलांचे प्रश्न सुटतील? यावर भाजप नेत्या चित्रा वाघ(BJP leader Chitra Wagh) यांनी दिलेली प्रतिक्रिया देखील चांगलीच चर्चेत आली आहे. आम्ही विरोधात असताना आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर महिलांवरील अत्याचार कमी होतील हे कधी म्हटलं नव्हतं. राज्यात महिला मुख्यमंत्री झाल्यावर महिलांचे प्रश्न लगेच सुटतील अशी मानणारी मी नाही असं चित्रा वाघ म्हणाल्या.