पुण्यात चित्रपटगृहांमध्ये खराब दर्जाचे समोसे; उत्पादन बंद करण्याचे आदेश
चित्रपटगृहांमध्ये अत्यंत गलिच्छ ठिकाणहून सामोसे येत असल्याचे उघड...
पुणे : पुणे शहरातील आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेपोलीस, विशाल इ - स्क्वेअर या चित्रपटगृहांमध्ये अत्यंत गलिच्छ ठिकाणहून सामोसा येत असल्याचे समोर आले आहे. या सामोशाचे उत्पादन तात्काळ बंद करण्यात आले आहे. समोसा पुरवठा करणाऱ्या समोशाच्या दुकानातले उत्पादन बंद करण्याचे आदेश अन्न आणि औषध पुरवठा विभागाने दिले आहेत. ज्या ठिकाणी हे सामोसे तयार करण्यात येत होते, तिथे प्रचंड अस्वच्छता असल्याने या समोसा पुरवठादारावर ही कारवाई करण्यात आली आहे.
एम. के. एन्टरप्रायजेस असे या समोसा उत्पादकाचे नाव आहे. तो पिंपरीमधल्या खराळवाडीत समोसे तयार करण्याचे काम करतो. मल्टिप्लेक्समध्ये १०० ते १२० रुपयांना दोन सामोसे मिळतात. दोन समोशांसाठी नागरिक मोठी किंमत मोजतात. परंतु इतके पैसे खर्चूनही चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांना मात्र अत्यंत खराब दर्जाचे खाद्यपदार्थ दिले जातात. पण ते कुठे तयार केलेले असतात, याचे धक्कादायक उदाहरण यानिमित्ताने समोर आले आहे.