कल्याण : बदलापूर ते कर्जत-खोपोली दरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे (update 8.30 am) तर वांगणी स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पावसाच्या पुराचं पाणी आल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महालक्ष्मी एक्स्प्रेस जिथे अडकली आहे, तिथे ट्रॅकवर २ फुटांपर्यंत पाणी असल्याचं प्रवाशांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे, तसेच लवकरच आम्हाला सोडवण्यासाठी टीम पाठवा अशी विनवणी देखील प्रवासी करतायत.वांगणी स्थानकात देखील रुळांवरील पाण्याची पातळी वाढली आहे.


बदलापूर शहरात ठिकठिकाणी पाणी भरलं आहे. रस्ताकुठे याचा अंदाज लावणे देखील बदलापुरकरांना कठीण झाले आहे.


मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे, तर आकाश ढगाळ असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे बदलापूर स्थानकातील पाणी ओसरण्यास सुरूवात झाली आहे.


मुंबईत पावसाचा मागील ३ तासांपासून जोर ओसरला असला, तरी कल्याण-बदलापूर आणि कल्याण-कर्जत येथील पाणी वेगाने कमी होण्याची शक्यता अजून दिसून येत नाहीय.