बदलापूर अत्याचार प्रकरणः शाळेतील आणखी काही मुलींवर अत्याचार?; SITकडून पालकांना महत्त्वाचं आवाहन
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर अत्याचार प्रकरणात सतत नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता एसआयटीने आणखी एक नवी शक्यता वर्तवली आहे.
Badlapur Case Update: बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. या प्रकरणानंतर राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली होती. आता तपास यंत्रणाने या प्रकरणात धक्कादायक संशय व्यक्त केला आहे. त्यामुळं अनेक पालकांच्या पायाखालची जमीन घसरली आहे.
बदलापूर येथील एका नामांतर शाळेत तीन वर्षांच्या दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. शाळेतीलच सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यांनी चिमुरडींनी स्वच्छतागृहात नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले होते. पीडित चिमुकलीच्या गुप्तांगाला गंभीर इजा झाल्यानंतर तिने तिच्या पालकांना सांगितले. जेव्हा त्यांनी वैद्यकीय तपासणी केली तेव्हा हा सगळा प्रकार उघड झाला आहे. या घटनेनंतर बदलापूरात पालकांचा पोलिस आणि शाळा प्रशासनाविरोधात एकच भडका उठाला. 20 ऑगस्टरोजी मोठ्या संख्येने पालक आणि रहिवाशी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. त्यानंतर या प्रकरणात सरकारने एसआयटी स्थापन केली. आता या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणात एसआयटी सजग राहून तपास करत आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने आणखी काही शक्यता मांडल्या आहेत. शाळेतील आणखी काही मुलींसोबत असे प्रकार झाले असल्याच्या संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळं शिशुवर्गात शिकणाऱ्या मुलींच्या पालकांना एसआयटीकडून काही मेसेज पाठवण्यात आले आहेत. शाळेतील आणखी काही मुलींसोत असे प्रकार झाले असल्याचं पालकांनी समोर यावं, असं अवाहन एसआयटीने केलं आहे.
सध्या सरकारने जी चौकशी समितीने नेमली आहे त्यात एसआयटीचा समावेश आहे. एसआयटीच्या तपासानुसार, नराधम अक्षय शिंदे हा 15 दिवस स्वच्छता कर्मचारी म्हणून त्या शाळेत काम करत होता. या 15 दिवसांत त्याने आणखी काही मुलींसोबत दुष्कृत्य केलंय का? याचा शोध तपास यंत्रणांकडून घेत आहेत. त्यामुळं तपास यंत्रणांनी शाळेतील मुलींच्या पालकांना मेसेज पाठवले आहेत. मुलींबाबत असा काही प्रकार घडलेत का तर पुढे या आणि तक्रार करा. जेणेकरुन अक्षय शिंदेविरोधात आणखी पुरावे गोळा करण्यात येतील. तपास यंत्रणांने तसे एसएमएस मुलींच्या पालकांना केले आहेत. त्यामुळं आता आणखी काही पालक समोर येताहेत का? की या प्रकरणाला नेमकं काय वळण येईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.