Suresh Padvi Joins BJP: विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपावरुन राडा झालेला असताना मोठा धक्का बसला आहे. बहुजन विकास आघाडीचे डहाणूचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी भाजपात प्रवेश करत भाजपाचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे सगळी राजकीय समीकरणं बदललली आहेत. सुरेश पाडवी यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी चर्चा करून अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डहाणू विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या आदल्या दिवशी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांनी भाजपाचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. सुरेश पाडवी यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी चर्चा करून अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला. या घडामोडींमुळे डहाणू मतदारसंघातील निवडणुकीत भाजपची ताकद वाढली असून विरोधी पक्षांसाठी ही मोठी चिंतेची बाब ठरली आहे.


विरारमध्ये राडा


विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुफान राडा झाला आहे. येथील विवांता हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांमध्ये राडा झाला असून त्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप होत असताना बहुजन विकास आघाडीने त्यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला जात आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणानंतर हॉटेलमध्ये धुमाकूळ घातला. विशेष म्हणजेच हे पैसे वाटप होत असताना भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेही उपस्थित असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीने केला आहे. आमदार क्षितीज ठाकूर सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांबरोबर पोहोचले होते. यावेळेस या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. वाद अजून चिघळू नये म्हणून पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दिसले.


जिल्हाधिकारी काय म्हणाले?


वसईच्या तुळींज येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपा नेते विनोद तावडे आणि भाजपचे काही कार्यकर्ते तेथे पैसे वाटप करत असल्याची तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाची टीम तिथे पोचली. त्या ठिकाणी एसएसटी टीमला 9 लाख 93 हजार 500 रुपये सापडले आहेत. त्याचबरोबर इतर कागदपत्रंही सापडली आहेत. कार्यवाही सुरू असून पोलिसांनी सुद्धा तशी तक्रार दाखल केली असून हॉटेलची पूर्ण तपासणी करून त्याबाबतीत पूर्ण कारवाई करण्यात येईल असं पालघरचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितलं आहे.