एकनाथ खडसे यांना १५ हजारांचा जामीन मंजूर
या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शेतकऱ्यांनी जाफराबाद येथील न्यायालयात दाद मागितली होती.
जालना : शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी एकनाथ खडसे यांना १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे स्वत: जाफराबाद न्यायालयात हजर होते.
मुलींसोबत फोनवर बोलता यावं म्हणून शेतकरी महिन्याच्या महिन्याला मोबाईलच बिल भरतात पण वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत, असं वादग्रस्त वक्तव्य तत्कालीन ऊर्जामंत्री एकनाथ खडसे यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत केलं होतं.
या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शेतकऱ्यांनी जाफराबाद येथील न्यायालयात दाद मागितली होती.