औरंगाबाद : संभाजीनगर येथील सभेची मोठ्या जोशात तयारी सुरु आहे. राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे आजच्या सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार याची उत्सुकता आहे. बऱ्याच काळानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बाहेर सभा घेत आहे. या सभेला मराठवाड्यातील लाखो शिवसैनिक येतील, असा विश्वास शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधकांनी या सभेवर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे काही मोठे काम करून ठेवले आहे. त्याचा हा द्वेष आहे. शिवसेना पक्षप्रमुख यांच्याबद्दल विरोधकांचा व्यक्तिगत द्वेष असू शकतो. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबद्दल काय बोलावे, कसं बोलावे याच भान त्यांनी ठेवले पाहिजे.


विरोधक यांचे तोंड गटार आहे. पण, अशाप्रकारे तुमच्या  तोंडातून जर भिजलेले फटाके फुटणार असतील तर त्याची पर्वा आम्ही करत नाही, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.


राज्यसभेच्या निवडणुकीबाबत शरद पवार, मुख्यमंत्री यांनी कालच आमदारांना मार्गदर्शन केले आहे. सरकार स्थापन करताना जे छोटे घटकपक्ष आमच्यासोबत होते. ते आजही आमच्यासोबतच आहेत. समाजवादी पक्षाच्या नेत्यासोबतही आमचे बोलणे झाले आहे.


राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार सत्तेत येत असताना कॉमन मिनिमम प्रोग्रॅम ठरविण्यात आला होता. ज्यात राज्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार राज्याच्या कारभार होता असल्याचे त्यांनी सांगितले.


मनसेची टीका आणि राऊत यांचे उत्तर


शिवसेनेला अजूनही बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो सभेवर लावावे लागतात असा आरोप मनसेने केला होता. त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले. शिवसेनेच्या सभेला बाळासाहेब ठाकरे यांचा नाही तर मग कुणाचा फोटो लावणार? बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याची मनसेला ऍलर्जी आहे का ? असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला.