रत्नागिरी : राज्यातील पर्ससीन मासेमारीला आजपासून बंदी आदेश लागू करण्यात आलेत. शासनाच्या नव्या अध्यादेशानुसार महाराष्ट्र सागरी क्षेत्रामध्ये मासेमारी करण्याची त्यांची चार महिन्यांची मुदत ३१ डिसेंबरला संपली. त्यामुळे पर्ससीनद्वारे होणाऱ्या मासेमारीवर बंदी लागू झालीय. 


बंदीचा व्यवसायावर थेट परिणाम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंदीचा मासळी व्यवसायावर पन्नास टक्के थेट परिणाम होणार आहे. असं असलं तरी बारा नॉटिकल मैलबाहेर खोल समुद्रात व्हीटीएस प्रणाली बसवून पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करता येईल. मासेमारी हा जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय आहे. 


चोरटी मासेमारीला लगाम


पर्ससीन, पारंपरिक मासेमारी, रापण, छोटे व्यावसायिक आदींद्वारे मासेमारी केली जाते. याला अनुसरून बर्फ फॅक्‍टरी, जाळी विक्री व्यावसायिक, पाणी-डिझेल पुरविण्याचा व्यवसाय, खलाशी, टपरीवाले, मासे सोलणारे, विक्री करणारी आदी जोड व्यवसाय आहेत.पर्ससीन जाळ्यांच्या द्वारे चोरटी मासेमारी गेल्या दोन वर्षात करताना अनेकवेळा निदर्शनास आले आहे. 



आता कायदेशीर कारवाई 


त्यामुळे पारंपरिक आणि पर्ससीनधारक मच्छिमार यांच्यात अनेकवेळा वाद देखील झाले आहेत. आता जर मासेमारी करताना एखादी बोट सापडली तर तिच्यावर आता कायदेशीर कारवाई केली जाईल व तिचा असलेला परवाना व डिझेल कोटा रद्द करून कारवाई केली जाईल, असं सहाय्यक मत्स आयुक्तांनी सांगितले आहे.