नवी मुंबई : नवी मुंबईत बँक ऑफ बडोदाच्या जुईनगर शाखेवरील दरोड्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. कोलकात्याच्या हावडा परिसरातून मोईऊद्दीन शेख याला पकडण्यात आलंय. मोईऊद्दीन शेखकडून तब्बल ९० लाखांचं सोनं जप्त करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालच मालेगावातून ज्यानं चोरीचं सोनं विकत घेतलं, त्याला पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडेही ३७ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलं आहेत. आतापर्यंत याप्रकरणी एकूण चार जणांना  अटक करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदामधून चोरीला गेलेलं सोनं विकत घेणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी थेट मालेगावातून अटक केलीय. संजय वाघ असं या कारागिरीचं नाव आहे. 


मु्ंबई पोलिसांनी त्याला मालेगावमधून ताब्यात घेतलं. त्याच्याकडून अर्धा किलो सोन जप्त करण्यात आलंय. मालेगावच्या छावणी पोलिसात अटकेची नोंद करण्यात आलीय. गेल्या आठवड्यात जुईनगर रेल्वे स्टेशन नजीकच्या बॅंक ऑफ बडोदा शाखेवर ७० फुटावरील एका दुकानातून भुयार खोदून दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी जवळपास ३० हून अधिक लॉकर फोडून सुमारे २ कोटी रुपयांची मालमत्ता त्यांनी लुटल्याने एकच खळबळ उडाली.