नवी मुंबईतील बँक ऑफ बडोदा दरोडा प्रकरणी दोघांना अटक
नवी मुंबईतील जुई नगर येथे काही दरोडेखोरांनी भुयार खोदून बँक लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या दरोड्या प्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील जुई नगर येथे काही दरोडेखोरांनी भुयार खोदून बँक लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या दरोड्या प्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.
नवी मुंबई पोलिसांनी बँकेत टाकलेल्या दरोड्याप्रकरणी दोन आरोपींना गजाआड केलं आहे.
जुई नगर परिसरात असलेल्या बँक ऑफ बडोदावर दरोडा पडला. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने बँक बंद होती आणि सोमवारी बँक उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
दरोडेखोरांनी अगदी फिल्मी स्टाइलने बँकेवर दरोडा टाकला होता. या दरोड्यामुळे बँक कर्मचारीच नाही तर नवी मुंबई पोलिसही चक्रावून गेले होते.तपासादरम्यान बँकेबाहेरील एका सीसीटीव्हीमध्ये तीन दरोडेखोर दिसून आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
दोन्ही आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तर अद्याप तीन आरोपींचा शोध सुरु आहे.