Bank Job: कमी शिक्षण असल्याने आपल्याला नोकरी कोण देणार? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. पण आता अशा उमेदवारांनी काही काळजी करु नका. कारण बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅंक ऑफ इंडिया काऊन्सेलर, फॅकल्टी मेंबर. ऑफिस असिस्टंट, वॉचमन ही पदे भरली जाणार आहे. या पदांच्या एकूण 8 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. बॅंक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर आणि सांगली येथील शाखेत समुपदेशकाचे प्रत्येकी एक पद भरले जाणार आहे. 


कोल्हापूरच्या शाखेत फॅकल्टी मेंबर आणि ऑफिस असिस्टंचे प्रत्येकी 1 पद भरले जाणार आहे. तसेच सांगली येथील शाखेत ऑफिस असिस्टंट, अटेंडंटचे प्रत्येकी 1 आणि वॉचमनची 2 पदे भरली जाणार आहेत. काऊन्सेलर पदासाठी बॅंकेच्या निवृत्त अधिकाऱ्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.त्याचे वय 62 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर इतर पदांच्या पात्रतेचा तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. 



Mumbai Job: मुंबई पालिकेत बंपर भरती, टायपिंग येणाऱ्यांना मिळेल भरघोस पगाराची नोकरी


कोल्हापूर शाखेसाठी उमेदवारांनी आपले अर्ज बॅंक ऑफ इंडिया, कोल्हापूर झोनल ऑफिस, 1519 सी, जयधवल बिल्डिंग, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर येथे आपले अर्ज पाठवायचे आहेत. 1 सप्टेंबरपासून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून 15 सप्टेंबर ही अर्जाची शेवटची तारीख आहे. 


एसबीआयच्या मुंबई शाखेत भरती 


स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत सिनीअर वाइस प्रेसिडंटचे पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीजीडीएम/ पीजीडीबीएस/ एमबीए किंवा त्या समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कामाचा 15 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. 


SBI मध्ये 6 हजारहून अधिक पदांसाठी भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक


एसबीआयच्या  वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी होणारी मुलाखत 100 गुणांची असेल. मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उतरत्या क्रमाने गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्या. किमान पात्रता गुण मिळवलेल्या एकापेक्षा जास्त उमेदवारांची कट-ऑफ गुणांची यादी  त्यांच्या वयानुसार उतरत्या क्रमाने तयार केली जाणार आहे.  यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले असून 7 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.